Nashik News : जिल्ह्यात 3 तालुक्यांना मिळेना गटविकास अधिकारी; प्रशासनाची सुरू आहे कसरत

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने येथे प्रशासकीय राजवट आहे.
officer
officeresakal

Nashik News : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने येथे प्रशासकीय राजवट आहे.

पंचायत समित्यांच्या कारभार प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम बघत आहे.(In district 3 taluks do not have group development officer nashik news )

मात्र, जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव व इगतपुरी तालुक्यांतील गटविकास अधिकारी ही पदे रिक्त आहेत. एका बाजूला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, जिल्हा परिषदेतील योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम पंचायत समित्यांमार्फत होते. मात्र, अधिकारीच नसल्याने कामकाज करण्याची मोठी कसरत प्रशासनाला करावी लागत आहे.

या आठवड्यात चांदवडला गटविकास अधिकारी म्हणून मच्छिंद्र साबळे रुजू झाले. साबळे चांदवड पंचायत समितीतीतच सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची पदोन्नती होऊन त्यांना चांदवड मिळाले. वर्षभरापासून रिक्त असलेल्या मालेगाव पंचायत समितीलाही गटविकास अधिकारी मिळाले आहेत.

गोरेगाव (जि. गोंदिया) येथे कार्यरत असलेले अजितसिंग पवार यांची पदोन्नतीने मालेगावला बदली झाली. पवार गुरुवारी हजर झाले. पवार यांना तत्काळ हजर राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. पवार यांनी यापूर्वी नाशिक जिल्ह्यात पंचायत समिती, सुरगाणा येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर काम केले आहे. तसेच पंचायत समिती, चाळीसगाव व पाचोरा (जि. जळगाव) येथे सहाय्यक गटविकास अधिकारीपदी काम केले आहे.

officer
Nashik News : सरते वर्ष चांदवडकरांसाठी निराशाजनक अन आंदोलनाचे

चांदवड व मालेगावला अधिकारी मिळाले असले तरी, इगतपुरी, सिन्नर व नांदगावला अधिकारी मिळालेले नाहीत. नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांची धुळे येथे पदोन्नतीने बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांची बागलाण गटविकास अधिकारीपदी पदोन्नतीने बदली झाल्याने हे पद रिक्त आहे.

सिन्नर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे निवृत्त झाले आहेत. त्यांचा पदभार दत्तात्रय चित्ते यांच्याकडे आहे. त्यामुळे तीन तालुक्यात मुख्य प्रशासक नसल्याने कामकाज करण्याची कसरत सुरू आहे. निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने कामे वेळात व्हावी, यासाठी तत्काळ अधिकारी मिळावे, अशी मागणी होत आहे.

officer
Nashik News: सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर रोप-वे सेवा सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com