
मालेगाव कॅम्प (नाशिक) : कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती सध्या मालेगावात स्थिर असली तरी कधी उसळी घेईल याची शक्यता नसल्याने लसीकरण (vaccination) हाच पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही लसीकरणाच्या बाबतीत शहरातील पूर्व भागात अजूनही उदासीनता दिसून येत आहे. तर पश्चिम भागात लस घेण्यासाठी केंद्रात गर्दी होत आहे. (In eastern Malegaon the response of citizens towards Corona vaccination is still low)
राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून बॅनरबाजी
पूर्व भागात अजूनही नकारात्मक स्थिती आहे. महापालिकेत ८४ नगरसेवकांपैकी ६३ नगरसेवक पूर्व भागाचे प्रतिनिधित्व करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक असताना नागरिकांच्या प्रबोधनात उदासीनता मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याउलट पश्चिम भागात २१ नगरसेवक असताना १८ ते ४४ वयोगटांतील लस नोंदणीच्या जागृतीचे पोस्टर वॉर जोरदार असून, यामध्ये शिवसेना-भाजपचे आजी-माजी नगरसेवक, भविष्यातील इच्छुक उमेदवारांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये अनेक युवा चेहऱ्यांनी पोस्टर फ्लॅश करून नोंदणीचे आवाहन केल्याचे चित्र आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात रमजानसारख्या सणाचे कारण पुढे केले जाते. मात्र रमजाननंतर आठवडा झाला तरीही लसीकरण धिम्यागतीने सुरू असून, रिकाम्या फिरणाऱ्यांच्या भटकंतीला पूर्व भागात कुठेही आवर घातला जात नाही.
एरवी समाजकार्य करण्यात पुढे असलेल्या सामाजिक संस्था, रोटरी, लायन्स, राजकीय पक्ष कार्येकर्ते यांनी लसीकरणाचा टक्का वाढविण्यात प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अनेक नागरिक बोलून दाखवत आहेत. शहरातील १८ वर्षांवरील दोन हजार ४२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शहरातील लसीकरणासाठी दरदिवशी नियोजन करण्यात येत असून, उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण सुरू असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली. शहरातील विविध प्रभागात १६ नागरी आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम सध्या चालू आहे.
लशीसाठी युवकांचे ‘वेट ॲन्ड वॉच’
गरज लक्षात घेऊन १८ वर्षांवरील दोन हजार १८ नागरिकांना पहिला डोस, तर २४ जणांनी दुसऱ्या डोसचा लाभ घेतल्याची माहिती समजते. पहिल्या लाटेप्रमाणे मालेगाव पॅटर्न यशस्वी होऊन कोरोनावर सध्या तरी मात केली असली तरी लसीकरण महत्त्वाचे असल्याने अनेक युवक लस येण्याची वाट बघत आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर महापालिका आरोग्य यंत्रणेने तसे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे.
लसीकरण दृष्टिक्षेपात
कर्मचारी पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी २,५९२ १,७५१
सरकारी कर्मचारी २,३१३ १,५५४
४५ वर्षांवरील नागरिक ११,७७८ २,१२८
६० वर्षांवरील नागरिक ९,९४७ ४,५८८
एकूण लसीकरण २८,६४८ १०,०४५ - ३८,६९३
(In eastern Malegaon the response of citizens towards Corona vaccination is still low)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.