
मालेगावात अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच लॉकडाउन काळात इंधन पुरवठा
मालेगाव (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते २३ मेच्या मध्यरात्री बारापर्यंत लॉकडाउनबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात अत्यावश्यक वाहनांनाच (essential service vehicles) इंधन पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे (District Petrol Dealers Association) अध्यक्ष भूषण भोसले यांनी कळविले आहे. (In Malegaon only essential service vehicles will be refueled during lockdown)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठ्यासाठी सुरू राहतील. त्यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व शासकीय वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, औषधे वाहने, सर्व मालवाहतूक वाहने छोटी व मोठी, ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने, शेती आधारित ट्रॅक्टर, हार्वेस्टर, जेसीबी व अन्य वाहने यांना पुरवठा करण्यात येईल. तसेच डॉक्टर, रुग्णालये, नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट, सफाई कर्मचारी, बँक कर्मचारी, पोस्टमन, महावितरण, टेलिफोन व इंटरनेट सेवा पुरविणारे, पत्रकार आदींना ओळखपत्र तपासून इंधन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा: नाशिकमध्ये बालरुग्णालयांमध्ये २५ टक्के खाटा राखीव; तिसऱ्या लाटेसाठी सज्जता
कोणाला मिळेल इंधन?
यासह ई-कॉमर्स डिलिव्हरी करणारे मोटारसायकल व मोठे वाहने यात अमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो आदींचे वितरक, किराणा, दूध, मद्य, भाजीपाला, जेवण पार्सल सेवा घरपोच पुरविणारी वाहने, औषधे व ऑक्सिजन कंपन्यांमधील कर्मचारी, गॅस एजन्सी, पेट्रोलपंप कर्मचारी आदींना इंधन देण्यात येईल. अत्यावश्यक कामासाठी व रुग्णांसाठी खासगी बस, रिक्षा, टॅक्सी तसेच बाजार समित्या बंद असल्या तरी पर्यायी व्यवस्थेबाबत निर्णय घेणे असल्याने शेतकऱ्यांनाही इंधन देता येईल. कोरोना लसीकरणासाठी त्या दिवसाची नोंदणी असलेले नागरिक व कोणत्याही खासगी वाहनात रुग्ण असल्यास, तसेच शासनाने दिलेले सर्व ई-पास असलेल्या खासगी वाहनांना इंधन देण्याच्या सूचना आहेत. याबाबत वाद झाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. नागरिकांनी या काळात सहकार्य करावे. शहर व जिल्ह्यातील डीलर यांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
(In Malegaon only essential service vehicles will be refueled during lockdown)
हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली
Web Title: In Malegaon Only Essential Service Vehicles Will Be Refueled During
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..