esakal | उन्हाळ कांदा खातोय भाव ! २५ ते ३०० रुपयांनी झाली वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळ कांदा खातोय भाव ! २५ ते ३०० रुपयांनी झाली वाढ

भावातील वाढीला नाशिकमध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी क्विंटलला शंभर रुपयांनी, तर कळवणमध्ये ५० रुपयांनी झालेली घसरण अपवाद राहिली.

उन्हाळ कांदा खातोय भाव ! २५ ते ३०० रुपयांनी झाली वाढ

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना (Corona) विषाणू फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनमधील कडक निर्बंधांतून शिथिलता देऊन बाजार समित्यांमधील (Market Committee) लिलावाला सुरवात झाल्याच्या मंगळवार (ता. २५)च्या दुसऱ्या दिवशी सोमवार (ता. २४)च्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या (Onion) भावात क्विंटलला २५ ते ३०० रुपयांनी वाढ (Increase) झाली. (In nashik, onion prices have gone up by rs 25 to rs 300 per quintal)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

पिंपळगाव बसवंतमधील लिलाव बंद झाल्यावर सोमवारी क्विंटलचा भाव सरासरी एक हजार ३५१ होता. मंगळवारी (ता. २५) पिंपळगावमध्ये एक हजार ६५१ रुपये सरासरी भाव राहिला. भावातील वाढीला नाशिकमध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी क्विंटलला शंभर रुपयांनी, तर कळवणमध्ये ५० रुपयांनी झालेली घसरण अपवाद राहिली.

हेही वाचा: कोरोनामुळे मृत्यूचा नाशिक जिल्ह्यात पुन्हा विस्फोट!

नाशिकमध्ये सोमवारी एक हजार ३५०, तर मंगळवारी एक हजार २५० रुपये क्विंटल सरासरी भावाने उन्हाळ कांद्याची विक्री झाली. सर्वांत कमी २५ रुपयांनी मुंगसेत, तर येवल्यात ५०, सटाणा आणि लासलगावमध्ये ६०, देवळा आणि नांदगाव व मनमाडमध्ये १५०, उमराणेत ११० रुपयांचा अधिकचा भाव मिळाला. चांदवडमध्ये मंगळवारी क्विंटलचा सरासरी भाव एक हजार ५५० रुपये राहिला. कडक निर्बंध शिथिल करून लिलाव सुरू झाले असले, तरी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाजार समित्यांच्या कामकाजासाठी चाचण्यांपासून ते गर्दीच्या व्यवस्थापन आणि शारीरिक अंतर राखण्यापर्यंतची नियमावली घालून दिली आहे. नियमावलीची अंमलबजावणी न झाल्यास आस्थापनेचे कामकाज बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा: दिलासादायक! नाशिक शहरात कोरोना रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ मंगळवारी सोमवारी (ता. २४)

अंदरसूल (येवला) १४०० १३५०

लासलगाव १४६० १४०१

मुंगसे १२०० ११७५

कळवण १४५१ १५०१

मनमाड १४०० १२५०

सटाणा १४१० १३५०

नांदगाव १४५० १३००

देवळा १५०० १३५०

उमराणे १४६० १३५०

(In nashik, onion prices have gone up by rs 25 to rs 300 per quintal)