ऑनलाइनच्या जमान्यात ऑफलाइन खरेदीची क्रेज न्यारी | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The craze for offline shopping in the age of online

ऑनलाइनच्या जमान्यात ऑफलाइन खरेदीची क्रेज न्यारी | Nashik

जुने नाशिक : सध्याच्या युगात खरेदीपासून ते बँक व्यवहारापर्यंत ऑनलाइन प्रक्रियेचा वापर केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्ष खरेदीची क्रेझ मात्र न्यारी असल्याचे बाजारपेठेतील गर्दीतून अनुभवास मिळते. अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून सर्व व्यवहार ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. इतकेच काय तर एखाद्यास रक्कम देणे अपेक्षित असेल तर तीदेखील ऑनलाइनच्या विविध माध्यमातून दिली जात आहे.

कपडे, दागिने खरेदी ऑफलाइनच

विविध प्रकारची खरेदीदेखील यातून सुटलेली नाही. असे असले तरी प्रत्यक्ष खरेदीस अधिक महत्त्व दिले जाते. केवळ पंचवीस ते तीस टक्के नागरिकच ऑनलाइन खरेदीस पसंती देत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. विशेषतः कपडे, दागिने खरेदीसाठी प्रत्यक्ष खरेदीवर भर दिला जात आहे. याशिवाय एखादी वस्तू, ड्रेस खरेदी करायचा असेल तर ऑनलाइन मागविणे ठीक आहे. मोठी खरेदी मात्र प्रत्यक्षात होणे आवश्यक आहे. असा समज आजही नागरिकांमध्ये आहे. त्याचे कारण त्यांनी तसे स्पष्ट केले आहे. कपड्यांचा विचार केला तर विविध प्रकारच्या ॲपवर कपड्यांची डिझाईन, रंग, साईज दाखवली जाते.

हेही वाचा: उन्हाच्या झळा पशु- पक्ष्यांच्या जीवावर | Nashik

ऑर्डर केल्यानंतर तीच वस्तू, तोच कपडा, तोच रंग, तीच साईज प्राप्त होईल असे सांगणे अवघड असते. प्रत्यक्ष खरेदीत एकावेळी अनेक प्रकारचे डिझाईन कपड्याची, क्वॉलिटी रंग बघून घेता येतो. कपड्याची क्वॉलिटी बरोबर नसेल तर लगेच दुसऱ्या कपड्यांची मागणी केली जाते. याशिवाय दरांमध्ये कमी जास्त प्रमाण करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरेदीचा आनंद घेता येतो. बाजारातील कपड्यामधील विविधता बघावयास मिळते. सोन्याच्या दागिन्यांच्या (gold jewellery) बाबतीतदेखील विश्वसनीयता प्रत्यक्ष खरेदीतच मिळत असते. ऑनलाइनमध्ये फसवणूक होण्याचेदेखील अनेक प्रकार समोर आले आहे. अशा गोष्टींना प्रत्यक्ष खरेदीत फाटा बसत असतो. खरेदी केलेल्या कपडे, दागिन्यांत काही तक्रारी जाणवल्या तर त्या परत करून दुसरे कपडे, दागिने घेणे शक्य होते.

हेही वाचा: मालेगाव महानगरपालिकेला लाभले दोन उपायुक्त; सहाय्यक आयुक्त पद रिक्तच

विश्वासार्हता जास्त

ऑनलाइन खरेदीपेक्षा (Online Shopping) प्रत्यक्ष खरेदीमध्ये (Offline Shopping) विश्वासार्हता अधिक असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिले आहे. प्रत्यक्ष खरेदीमध्ये वेगळा आनंद असतो. खरेदीच्या माध्यमातून कुटुंबीयांबरोबर बाजारात वेळ घालविण्याची संधी मिळत असते. शिवाय आपण जी वस्तू पसंत केली आहे. तीच वस्तू आपणास प्रत्यक्ष खरेदीत मिळत असते. ऑनलाइन खरेदीच्या बाबतीत मात्र बहुतांशी वेळा तसे घडत नाही.

"ऑनलाइन खरेदी करताना हवी तशी खरेदी करता येत नाही. विश्वासार्हता कमी असल्याने आजही नागरिकांची प्रत्यक्ष खरेदीला अधिक पसंती आहे. याचे उदाहरण म्हणजे बाजारातील विविध दुकानांमध्ये होणारी गर्दी."

- सतीश सचदेवा, व्यावसायिक

Web Title: In The Age Of Online Shopping Offline Shopping Craze Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..