सिन्नर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील मुख्य बाजारात अंतर्गत रस्ते डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध कामांचे लोकार्पण पार पडले. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण करण्याची सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी या वेळी केली..सहाय्यक निबंधक संजय गिते, सभापती गणेश घोलप, उपसभापती सिंधु कोकाटे, संचालक शशिकांत गाडे, सुनील चकोर, रवींद्र शेळके, जालिंदर थोरात, शरद थोरात, श्रीकृष्ण घुमरे, प्रकाश तुपे, ॲड शरद चतुर, नवनाथ घुगे, नवनाथ नेहे, भाऊसाहेब खाडे, सचिव विजय विखे आदी उपस्थित होते..बाजार समितीचे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याची मागणी शेतकरी व व्यापारी करत होते. या बाबत निविदा प्रक्रिया राबवून हे काम करण्यास सुरवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. शुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण पार पडले. शेतकऱ्यांना बाजार समितीकडून शेतमाल विक्रीसाठी दैनंदिन बाजारभाव ऑनलाइन पाहता यावेत, या साठी संकेतस्थळ www.apmcsinnar.com सुरु करण्यात आले आहे. त्यावर दररोज पिकांचे बाजारभाव पहावयास मिळणार आहेत. या बाबत या वेळी माहिती देण्यात आली..दोडी ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने डॉ. अमृता कटारे, डॉ. विलास बोडके, डॉ. राहुल शेळके, राजकुमार आनेराव, संगीता गायकवाड, प्रतिभा गोणटे यांच्या पथकाने शेतकरी, हमाल-मापारी यांची आरोग्य तपासणी केली. या वेळी संजय सानप, केशव कोकाटे, सतीश ढोली, राजेंद्र जाधव, अशोक भालेराव, व्यापारी अनिल कलंत्री, शिवनारायण कलंत्री, बाबुशेठ लढ्ढा, बाळकृष्ण चकोर, सतीश चकोर, पप्पू गोळेसर, सुनील पन्हाळे, सुनील चोथे, सुजित भाबड, दत्तात्रय नवले, तुषार नवले, उत्तम पालवे आदी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.