
संततधार पावसाने जनजीवन विस्कळित; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
नाशिक : गेल्या ४८ तासांपासून संततधार पावसाने (rain) शहराला झोडपून काढले. सहलीनिमित्त शहराबाहेर पडणाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या (traffic) समस्येला सामोरे जावे लागले. तर, गेल्या २४ तासात पावसाचा जोर वाढल्याने शहरातील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. एकूणच, संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून आले. (Incessant rains disrupt public life Nashik Latest Monsoon News)
तब्बल सव्वा महिन्याच्या विलंबाने नाशिकमध्ये पावसाने शनिवार (ता.९) पासून हजेरी लावली. तर, रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले. परिणामी, गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या संततधारेमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली. अनेक ठिकाणी रस्ते उखडल्याने जागोजागी खडे पडले आहेत.
बहुतांशी सिग्नलच्या ठिकाणी रस्ते जलमय होऊन खड्डे पडले. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणचे सिग्नल यंत्रणा पावसामुळे कोलमडून पडली. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मध्यवर्ती भागातील व्यावसायिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. गोदावरी नदीवरील होळकर पुलावर पुराचे पाणी पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करतात.
या वेळी मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी गर्दी होत असते. यातून यापूर्वी दुर्घटना घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंचवटी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात केला होता. कोणालाही पुलाच्या कठड्यावर येण्यास मनाई केली जात होती. त्याचप्रमाणे, नदीवरील दहिपूल, गाडगे महाराज पूल या ठिकाणीही पोलिस तैनात होते. दहिपूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून दक्षतेच्या सूचना दिल्या जात होत्या.
हेही वाचा: Corona Update : जिल्ह्यात तब्बल 168 पॉझिटिव्ह, एकाचा बळी
ट्रॅफिक सिग्नलवर पोलिस
गेल्या दोन दिवसात पावसामुळे वाहतूक यंत्रणा कोलमडल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. सोमवार (ता.११) मात्र वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती दिसून आली. सिग्नल यंत्रणा सुरू असूनही पावसामुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक पोलिसांकडून ती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात होते.
हेही वाचा: वरुणराजाची धुवांधार ‘बॅटिंग'; हवामान विभागाचा 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा
Web Title: Incessant Rains Disrupt Public Life Nashik Latest Monsoon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..