दुगारवाडी येथील घटना; धबधब्यात बुडालेल्याचा मृतदेह सापडला | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dugarwadi Waterfall news

दुगारवाडी येथील घटना; धबधब्यात बुडालेल्याचा मृतदेह सापडला

नाशिक : रविवारी सुटीनिमित्त त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्यावर पावसाळी पर्यटनाला गेलेल्या २८ पैकी २७ जणांना मध्यरात्री उशिरा सुखरूप काढण्यात यश आले; पण अविनाश गरड (४०, आंबेजोगाई, बीड) वाहून गेले.

त्यांच्या शोधासाठी सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुपारी धबधब्यापासून साधारण साडेतीन किलोमीटरवर मृतदेह सापडला. दरम्यान, पर्यटन स्थळांवर दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा बंदीचा विचार सुरू आहे. (Incident at Dugarwadi body of drowned man was found in waterfall nashik Latest marathi news)

हेही वाचा: तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी MSRTCतर्फे 230 बस

रविवारी त्र्यंबकेश्वर येथे सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी आणि धबधब्याला पूर आला. त्यात पावसाळी पर्यटनाला गेलेल्या २८ पैकी २३ जण पुरात अडकले. रात्री उशिरापर्यंत अडकलेल्या २३ जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

त्यातील २२ जणांना मध्यरात्री दीडच्या सुमारास सुखरूप काढण्यात आले, तर एकजण बेपत्ता आहे. दुगारवाडी धबधबा येथे २८ पैकी पाच जण शनिवारी पुराचे पाणी वाढत असताना कसेबसे निघाले; पण अडकलेल्या २२ पर्यटकांची सुखरूपपणे आज पहाटे दीडच्या सुमारास ग्रामस्थ, नाशिक क्लाइंबर अॅन्ड रेस्क्यू असोसिएशन, वन विभाग, महसूल व पोलिस प्रशासन यांच्या खडतर प्रयत्नानंतर काढण्यात आले.

रविवारच्या सुटीमुळे नाशिक येथील २८ पर्यटक दुगारवाडी येथे गेले होते. सायंकाळी अचानक पावसाचा जोर वाढला. त्यामुळे नदी आणि धबधब्याचा प्रवाह वाढल्याने त्यातील पाच जण कसेबसे परत फिरले, तर उर्वरित २३ जण धबधब्याच्या पलीकडे अडकले.

त्यातील परतलेल्या पाच जणांनी इतरांच्या बचावासाठी संपर्क साधल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर उपवनसंरक्षक रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार स्वप्नील सोनवणे, मंडल अधिकारी हेमंत कुलकर्णी आदींसह बचाव पथकाने मध्यरात्री उशिरापर्यंत मोहीम राबवत २१ जणांना सुखरूप बाहेर काढले, तर वाहून गेलेल्या अविनाश गरड यांचा मृतदेह शोधण्यात सोमवारी दुपारी यश आले.

"धबधबे आणि पानथळावर होणारी गर्दी आणि दुर्घटनामुळे प्रशासन पर्यटकांना बंदी घालण्याचा विचार करीत आहे. नागरिकांनी पर्यटन करताना धबधबे-धरणांवर गर्दी करू नये."

- गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक

हेही वाचा: पेव्हर ब्लॉक प्रकल्पाला अडचण कोणाची?

Web Title: Incident At Dugarwadi Body Of Drowned Man Was Found In Waterfall Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..