esakal | नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सराईताचा गोंधळ; डॉक्टरांना धक्काबुक्की
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सराईताचा गोंधळ; डॉक्टरांना धक्काबुक्की

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोवीड लस (covid vaccine) देण्याच्या कारणातून एकाने इंदिरा गांधी रुग्णालयात (hospital) गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार पंचवटी कारंजा भागात घडला. रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या संशयिताविरोधात यापूर्वीही भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. (Indira Gandhi Hospital)

रुग्णालयात सराईताचा गोंधळ

रुग्णालयात गोंधळ घातल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी पोलीस रेकॉर्ड वरील एका संशयितास अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृणाल भालचंद्र घोडके (३३ रा.लक्ष्मी प्राईड,टाकळी रोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी विजय मोतीराम देवकर (रा.उंटवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रूग्णालयात घडली. देवकर या रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक असून मंगळवारी (ता.१८) ते सेवा बजावत असतांना तेथे आलेल्या संशयिताने माझी आई व्हॅक्सीन घेण्यासाठी आली आहे. इतका वेळ लागतो का ? तुम्ही डॉक्टर माजले आहेत. असे म्हणून देवकर यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच धक्काबुक्की करून कोवीड साथ रोगाचे प्रतिबंधक महत्वाचे काम करीत असतांना सरकारी कामात व्यत्यय आणला.

हेही वाचा: भाऊ, आपले नगरसेवक कोणते हो? 4 जणांच्या प्रभागामुळे नागरिकांमध्ये गोंधळ

loading image
go to top