
Jal Jeevan Mission : तालुक्यातील लोहशिंगवे,पोखरी, चांदोरा, मंगळणे, शास्त्रीनगर, जळगाव खुर्द,धनेर, खादगाव या दुष्काळग्रस्त भागातल्या गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश करण्याबाबतचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशनच्या सचिवांना निर्देश दिले आहेत.
यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. (Inclusion of villages in Nandgaon Taluka in Jal Jeevan Mission Plan nashik news)
तालुक्यातील मौजे लोहशिंगवे,पोखरी, चांदोरा, मंगळणे, शास्त्रीनगर, जळगांवखुर्द , धनेर, खादगाव दुष्काळग्रस्त भागात असल्याने नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्भव असलेल्या ठिकाणी उन्हाळ्याचे कालावधीत भूजल पातळी खोलवर जाऊन माहे एप्रिल, मे व जून महिन्यात रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असते.
त्यामुळे या दुष्काळग्रस्त गावांचा जलजीवन मिशन योजनेच्या आराखड्यास समावेश करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे त्यांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहमती दाखविल्याने या गावांचा जलजीवन मिशनच्या कृती आराखड्यात समावेश होण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाल्याने गावकऱ्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.