esakal | रस्त्याचे काम अपूर्णच अन् श्रेयवादासाठी राजकीय सोशल वॉर सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

incomplete construction of nampur nalkas road politics

रस्त्याचे काम अपूर्णच अन् श्रेयवादासाठी राजकीय सोशल वॉर सुरू

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नळकस रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील, ग्रामपंचायत प्रशासन, जेसी ग्रुप आदींकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु, या रस्ता कामाच्या मंजुरीपूर्वी श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याने सोशल मीडियावर राजकीय कलगीतुरा रंगला आहे. श्रेयवादापेक्षा प्रत्यक्षात काम मार्गी लागणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्याची चाळण

नळकस रस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक ९ म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन किलोमीटर नळकस रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. परंतु, शहरात सटाणा बाजार समितीच्या माध्यमातून कांदा खरेदी मार्केट सुरू झाल्यानंतर रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरवात झाली. कांदा मार्केट सुरू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी मोठमोठे शेड तयार केले. त्यामुळे कांदा खरेदी करणाऱ्या परराज्यातील बारा, चौदा टायर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

हेही वाचा: नांदगावकरांच्या नशिबी वाहतूक कोंडी कायमच; नागरिकांना मनस्ताप

‘सकाळ’ने केला पाठपुरावा

नळकस रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा करून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून नववसाहतीमधील नागरी समस्यांना वाचा फोडली आहे. नववसाहतीमधील नागरिकांच्या सोयीसाठी जायखेडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य यतींद्र पाटील यांनी याकामी पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे ठरविले. लेखाशीर्ष ३०५४ मधून रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष, बांधकाम सभापती डॉ. सयाजीराव गायकवाड यांना निवेदन दिले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच रेखा पवार, परिवर्तन पॅनलचे प्रमुख विनोद सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी रस्त्याच्या कामासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर जेसी ग्रुपच्या वतीने रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी जेसी गटाचे नेते विलास सावंत, बाजार समिती संचालक अविनाश सावंत, दीपक पगार यांनी जिल्हा परिषदेला निवेदन दिले.

हेही वाचा: नाशिक : गुजरात पोलिसांच्या 'त्या' कारवाईची अखेर उकल

''माझ्या मतदारसंघातील अनेक नागरिक नामपूर येथील नववसाहतीत राहत असल्याने त्यांच्या सोयीसाठी नळकस रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पेट्रोलपंप ते महावितरण कंपनी कार्यालयापर्यंत स्टीलचा वापर करून दर्जेदार काँक्रिटीकरण करण्याचा मनोदय आहे. रस्त्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, रस्त्याच्या मुद्द्यावरून होणारे श्रेयवादाचे राजकारण व्यथित करणारे आहे.'' - यतींद्र पाटील, जि. प. सदस्य, जायखेडा गट

loading image
go to top