Nashik News: सरण ही थकले मरण पाहुणी...; मरणानंतरही भोगाव्या लागतात नरकयातना

At Umbarde (W) (T. Surgana), villagers build a pyre by laying tarpaulin on the ground in the absence of a cremation shed.
At Umbarde (W) (T. Surgana), villagers build a pyre by laying tarpaulin on the ground in the absence of a cremation shed.esakal
Updated on

Nashik News : ‘सरण ही थकले मरण पाहुणी... मरणानंतरही भोगाव्या लागतात नरकयातना...’ या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणाऱ्या ओळी नसून, प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील पळसन ग्रामपंचायतमधील उंबरदे (प) येथे स्मशानभूमीअभावी भरपावसात दोन मृतदेहांची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे. (incomplete with all facilities crematorium amenities cleanliness seating toilets plantations lights rainwater harvesting at palasan nashik)

उंबरदे(प) येथे दोन वयोवृद्धांचे आकस्मिक निधन झाले. त्याचवेळी सकाळपासूनच संततधारेमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमीला शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचताना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला.

कसेबसे सरण रचल्यानंतर संततधारेमुळे चितेला अग्नी द्यायाची कशी, अशा प्रश्न नागरिकांना पडला. कित्येकदा संततधारेमुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात.

काही जागरूक ग्रामस्थांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेली स्मशानभूमीत स्वच्छता, आसनव्यवस्था, प्रसाधनगृह, वृक्षारोपण, दिवे, पावसाचे साठवलेले पाणी अशा सुखसोयी उपलब्ध केलेल्या आहेत.

तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी येथे अजूनही स्मशानभूमीकरीता प्रतीक्षा करावी लागतेय, हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दर वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

At Umbarde (W) (T. Surgana), villagers build a pyre by laying tarpaulin on the ground in the absence of a cremation shed.
Dhule News: शहीद मनोज माळी यांना अखेरचा निरोप; वाघाडीकरांना शोक अनावर

मात्र अनेक गावांत स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते. शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

पळसनगावच्या ग्रामपंचायतीत ११ महसुली गावे, तर चार पाडे समाविष्ट असून, उंबरदे (प), पातळी, पायरपाडा, वाघाडी, देवळा, कोटबा, मेरदाड, पळशेत या गावांत स्मशानभूमी शेड उभारले नाही. अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

"पळसन ग्रामपंचायतमधील आठ गावांमध्ये एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात आकस्मिक निधन झाले तर सरण रचायला खूप अडचणी निर्माण होतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल."

- युवराज चौधरी, योगेश कनोजे, उंबरदे, मृताचे नातू

At Umbarde (W) (T. Surgana), villagers build a pyre by laying tarpaulin on the ground in the absence of a cremation shed.
Milch Animals Auction: वडांगळी येथे दुभत्या जनावरांचा लिलाव : आमदार वाजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.