नाशिक : कोरोनानंतर मोतीबिंदूच्या रुग्णांची वाढ चिंताजनक

cataract patient latest marathi news
cataract patient latest marathi news esakal

नाशिक : कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले असताना मोतीबिंदूच्या (Cataract) रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यात पुन्हा तिशीतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात तपासणीसाठी न धजावलेल्यांना पिकलेल्या मोतीबिंदूचा त्रास वाढल्याने रुग्णालयांमधून संख्या वाढत चालली आहे. (increase in cataract patients after corona is worrisome Nashik latest marathi news)

देशात कोरोनापूर्वी दर वर्षी ५० ते ६० लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होत असत. कोरोनाच्या दोन वर्षांत मात्र १५ लाख शस्रक्रिया झाल्या आहेत, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पूनम महाले यांनी दिली. नाशिकमध्ये कोरोनानंतर दोन हजारांहून अधिक मोतीबिंदू शस्रक्रिया झाल्या आहेत. दोन वर्षांत जनजागृती शिबिरे घेता न आल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच आर्थिक प्रश्‍नांमुळे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. मधुमेहग्रस्तांमध्ये मोतीबिंदू आजार वाढलेला दिसत आहे.

मास्कमधून श्‍वास बाहेर सोडताना तो डोळ्याच्या बाजूने जात असल्याने अनेकांचे डोळ्यांना त्रास झाल्याची बाब नेत्रतज्ज्ञांच्या निदर्शनास आली आहे. शिवाय मोबाईल स्क्रीनचा अधिक वापर आणि घरात बसून राहिल्याने ‘व्हिट्यामिन डी’ कमी मिळाले. याशिवाय सर्वांनी काम आणि अभ्यास करताना दर वीस मिनिटांनी वीस सेकंद वीस फूट दूर पाहावे. वीस वेळा डोळे उघड-झाप करावे. उठणे, पाणी पिणे या गोष्टी करणे आवश्यक आहे, असे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

cataract patient latest marathi news
नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर! नदीवरील पुल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

"कोरोनाकाळात नाशिकमधील डॉक्टरांनी ‘हॅलो आयएमए’ या उपक्रमांतर्गत रुग्णांना हेल्पलाइन क्रमांकावरून घरबसल्या उपचार केले. मोतीबिंदूचा आजार तरुणांमध्ये अधिक दिसतो आहे. त्यासंबंधाने ग्रामीण भागात जनजागृती होणे आवश्यक आहे. वेळेवर डोळ्यांची तपासणी केल्यास शस्रक्रिया नक्कीच टाळता येवू शकतात." -डॉ. पूनम महाले (नेत्ररोगतज्ज्ञ)

"मला वयाच्या २६ व्या वर्षी मोतीबिंदू झाला होता. त्याची शस्त्रक्रिया केली. आता कोरोनाकाळात वयाच्या चाळिशीमध्ये दुसऱ्या डोळ्यास मोतीबिंदू झाला. पण कोरोनाच्या भीतीने दवाखान्यात येण्यास उशीर झाला. आता शस्रक्रिया केली आहे. डोळ्यांचा त्रास होत असेल, तर अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे जायला हवे." -प्रेमा फर्नांडिस (रुग्ण)

cataract patient latest marathi news
Nashik : वडाळ्यात डेअरी फार्मवर छापा; 113 जनावरांची सुटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com