Nashik Crime News : अत्याचार पीडितांच्या संख्येत वाढ!

Rape News Nashik
Rape News Nashikesakal

पंचवटी (जि. नाशिक) : म्हसरूळ येथील द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल निवासी वसतिगृहाच्या संचालकाने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. नववीलाच शिक्षण सोडून गेलेली एक अल्पवयीन मुलगी समोर आली. यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती वाढली असून आता अल्पवयीन सहा मुलीवर तर एक सज्ञात मुलगी असा एकूण आकडा हा सात वर पोहचला आहे. (Increase in number of rape victims of mhasrul the king foundation hostel director rape students Nashik Latest Crime News)

म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात चौदा वर्षांच्या मुलीला संशयित संस्थाचालक हर्षल मोरे याने अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. अन्य मुलींच्या जाबजबाबात संशयिताने हातपाय दाबायला बोलवून व अनेक प्रकारे धमकावून अत्याचार केल्याचे म्हटले आहे.

सन २०१८ ते २०१९ पासून पाच अल्पवयीन मुली व एका सज्ञान मुलीचा समावेश होता.बुधवार (ता.३०) रोजी नववीला शिक्षण अर्धवट सोडून गेलेली अल्पवयीन मुलगी गुन्हा नोंद करण्या साठी पुढे आली आहे.यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली असून एकूण सहा अल्पवयीन मुली तर एक सज्ञान अशी पीडितांची एकूण संख्या सात वर गेली आहे.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Rape News Nashik
Nashik Crime: आई-बाप ठरले नकोशीचे वैरी; नवजात मुलीला सोडलं कुत्र्यांच्या तावडीत अन्...

"आदिम संघर्ष समन्वय समिती पुढाकार"

पहिल्या तक्रारदार मुलीने अत्याचार होत असल्यााबत चुलत बहिणींना कळविले. पीडितेच्या बहिणींनी हा प्रकार समितीच्या कार्यकर्त्यांस सांगितला. त्यानंतर गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला.

यानंतर पोलिसांना सहकार्य करीत आदिम संघर्ष समन्वय समिती पुढाकार घेत,अजून काही आदिवासी मुलीवर अत्याचार झाला आहे का?याचा शोध घेण्यास सुरू केले.यात त्यांना यश मिळाले असून आज रोजी गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Rape News Nashik
Nashik Crime News : 'तो' नराधाम विद्यार्थ्यांकडून करवून घेत होता वेठबिगारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com