NMC School : महापालिकेच्या शाळांमध्ये 845 विद्यार्थ्यांची वाढ! झोपडपट्टी भागात जाऊन सर्वेक्षण

NMC School
NMC Schoolesakal

NMC School : महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा परिणाम म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये तब्बल ८४५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी शंभर शाळांमध्ये २९ हजार ३७३ विद्यार्थी होते.

या वर्षी हीच संख्या ३० हजार २१८ झाली आहे. (Increase of 845 students in NMC municipal schools Survey by going to slum areas nashik news)

सर्वसामान्य नागरिकांचा महापालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम स्वरूपाचा आहे. त्यामुळे सरकारी शाळेपेक्षा खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठविण्याचा कल अधिक प्रमाणात आहे.

परंतु महापालिकेच्या शाळांचे अशा प्रकारचे चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी २६ हजारपर्यंत आलेली विद्यार्थिसंख्या आता टप्प्याटप्प्याने वाढत आहे. या वर्षी देखील महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी टक्का वाढविण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेंतर्गत झोपडपट्टी भागात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. अनेक भागात महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. महापालिकेच्या प्राथमिक ८८ व माध्यमिक १२ अशा एकूण शंभर शाळा आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC School
Nashik News: शिक्षण विभाग सांगणार तृणधान्याचे महत्त्व! 1 ऑगस्टपासून शाळांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम

यामुळे वाढला विद्यार्थ्यांचा टक्का

शालेय पोषण आहार, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांचे आधार संलग्नीकरण, स्मार्ट स्कूल प्रकल्प, विद्यार्थिनींसाठी सायकलवाटप या कारणांमुळे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे.

"महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी भर दिला जात आहे. त्यासाठी पर्यवेक्षी यंत्रणेद्वारे आढावा घेतला जात आहे. सुटीच्या दिवशीही त्यांचे आधी नसतं यंत्रणेस कार्यरत ठेवले जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे." - बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका

NMC School
Mission Indradhanush 5.0: ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ मोहीम प्रभावी राबवा; जिल्हाधिकारी जलज शर्मा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com