esakal | कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

legs pain

कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि.नाशिक) : कोरोना संसर्गाचा (coronavirus) प्रभाव कमी झाल्यामुळे काही प्रमाणात भीती कमी झाली आहे. मात्र, त्यानंतर पाय दुखण्यासारख्या व्याधींमध्ये वाढ होऊ लागल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेत त्यांना हिस्ट्रीशीट दाखवून गरज वाटल्यास चाचण्या करून घ्याव्यात, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (increased-leg-pain-disorders-nashik-marathi-news)

केवळ ज्येष्ठांनाच नाही तर तरुणांनाही त्रास

मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनामुळे अनेक कुटुंबांनी घरातील सदस्य गमावले आहेत. अनेकांचे अर्थकारण बिघडले आहे. आता हळूहळू कोरोना संसर्ग कमी होत असतानाच पाय दुखण्याने डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे हा त्रास केवळ ज्येष्ठांनाच नाही तर तरुणांनाही होऊ लागला आहे. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या दहापैकी किमान दोघे तरी पायदुखीने त्रस्त असल्याने याबाबतची काळजी वाढली आहे. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव घटत असताना डेंगी, चिकूनगुनियासारखे आजार डोके काढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यातच अलीकडे पायदुखीचे रुग्ण वाढू लागले आहेत.

शहराच्या विविध भागांत रुग्ण वाढू लागले

शहराच्या विविध भागांत असे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच पंचवटी विभागात हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. हा प्रकार मोठ्या प्रमाणात नसला तरी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचे पाय एका वेळी दुखू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. पाय दुखण्याबरोबरच तापही येत असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा तसेच स्वतःचे हिस्ट्रीशीट दाखवून गरज वाटल्यास चाचण्या करून घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्री; भारती पवार यांचा प्रवास

पाय दुखण्याबरोबरच वारंवार ताप येत असेल तर सीबीसी चाचण्या करून घराच्या परिसरात स्वच्छता राखावी, लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने चाचण्या करून घ्याव्यात.

-डॉ. नीलेश कुंभार्डे, अध्यक्ष, पंचवटी मेडिकल असोसिएशन

पाऊस लांबल्यामुळे वातावरणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे अंगदुखी, पायदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच संपर्क टाळा, भरपूर पाणी प्यावे. याशिवाय नियमित तपासण्याही आवश्‍यक आहेत. -डॉ. स्वप्नील पाटील, पंचवटी

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील संशयितांना न्यायालयीन कोठडी

loading image