कडाक्याच्या थंडीमुळे नाशिकमध्ये मांसाहाराला वाढती मागणी

विविध पदार्थांप्रमाणे ज्‍यांना शक्‍य आहे, त्‍यांनी मांसाहार करण्याचा सल्‍ला आहार तज्‍ज्ञांकडून दिला जातो
non veg
non veg esakal

नाशिक : मकर सक्रांतीनिमित्त(makar sankrant) आहारात भरपूर गोडधोड पदार्थ खाल्‍यानंतर आता खवय्ये तिखटकडे वळू लागले आहेत. त्‍यातच गारठा वाढला असताना, मांसाहाराला मागणी वाढली आहे. आवक मुबलक प्रमाणात असल्‍याने दर मात्र स्‍थिर असल्‍याचे व्‍यावसायिकांनी सांगितले.हिवाळ्यात उष्ण गुणात्‍मक आहाराची शरीराला आवश्‍यकता असते, म्‍हणून अन्‍य विविध पदार्थांप्रमाणे ज्‍यांना शक्‍य आहे, त्‍यांनी मांसाहार करण्याचा सल्‍ला आहार तज्‍ज्ञांकडून दिला जातो. (non-veg food)

गेल्‍या काही दिवसांपासून मकर सक्रांतीनिमित्त तीळगूळ, चिक्‍की, अशा गोड वस्‍तूंचे सेवन सुरू होते. अशात काहीसा बदल करत तिकट पदार्थांच्‍या आहारात समावेश केला जात आहे. यातून रविवारी (ता. १६) मांसविक्री दुकानांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळाली. मटण, चिकनसोबत मासळी पदार्थांनाही मागणी वाढली होती.

‘पाया’ला मागणी

अस्‍थिविकार असलेल्‍या, वृद्धांना हिवाळ्यात पाया सूप पिण्याचा सल्‍ला दिला जातो. अशात पायांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शंभर रुपये जोडीपासून पाया विक्री सुरू होती.

असे आहेत दर

स्‍थानिक बाजारपेठेत ६५० ते ६७० रुपये प्रतिकिलो दराने मटणची(meat) विक्री सुरू होती. तर ब्रॉयलर चिकन दोनशे रुपये प्रतिकिलोपासून पुढे विक्री केले जात होते. गावठी चिकन चारशे रुपये प्रतिकिलोपासून पुढे उपलब्‍ध होते. माशांचे दर सातशे ते एक हजार रुपये किलो होते. मांसाहाराप्रमाणे अंडींच्‍या(egg) मागणीत वाढ झाली आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून ग्राहकांकडून मांसाहारला(non-veg food) मागणी वाढली आहे. उपलब्‍धतेमुळे दरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. पुढील आणखी काही दिवस अशीच मागणी कायम राहण्याची शक्‍यता आहे.

-अनिल जाधव, विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com