
पर्यटनाला आली बहर, साहसी पर्यटनाची लहर
नाशिक : तप्त उन्हाळ्याने कमालीचा उकाडा जाणवू लागला आहे. अशात शहरवासीयांसह अन्य विविध ठिकाणांहून नाशिकला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात काहीशा गारव्याची अनुभूती मिळते आहे. येथील बोट क्लबला (Boat Club) भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांचा प्रतिसाद वाढता आहे. येथे पाण्याच्या लहरीवर स्वार होत साहसी पर्यटनाचा आनंद लुटताना अनेक पर्यटक बघायला मिळत आहेत. (Increasing response to MTDC boat club on Gangapur dam during summer vacation Nashik News)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (MTDC) गंगापूर धरण परिसरात बोट क्लब चालविला जातो आहे. या प्रशस्त जागेत नौकानयनाचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. क्रुझर जेटसह, बनाना राईड, क्रुझर शिप अशा विविध माध्यमातून नौकानयनाचा आनंद लुटला जातो आहे. एका व्यक्तीच्या राईडपासून सहा ते आठ जणांच्या समूहासाठी राईडचे पर्याय येथे उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे सहकुटुंब लहरीवर स्वार होताना आनंदोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसतो आहे. या उत्साहात सुरक्षेचे भान राखताना सहभागींना लाइफ जॅकेट हे सुरक्षिततेचा उपाय म्हणून घातले जात असते. या ठिकाणी दहा मिनिटांच्या लहान सफरपासून चाळीस मिनिटांपर्यंतच टूरदेखील घडविली जाते आहे. परिसरातच कॅन्टीन कार्यान्वित असून, येथील भव्य सभामंडपात बसून शांततेची अनुभूती अनेक पर्यटक घेता आहेत. या कॅन्टीनमुळे अल्पोपाहाराची सुविधादेखील झालेली आहे.
हेही वाचा: UPSC 2023 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Tourists taking Selfie at MTDC Boat club
विकेंडला लक्षणीय गर्दी
सध्या उन्हाळी सुट्या सुरू असल्याने तसे तर रोजच पर्यटकांची वर्दळ बोट क्लब परिसरात असते. परंतु, शनिवार व रविवार अशा विकेंडला शासकीय व खासगी कार्यालये बंद असल्याने या दिवशी गर्दीत लक्षणीय वाढ होत असते. अनेक जण सहकुटुंब येथे फेर फटक्यासाठी येत असतात. तरुणाईची उपस्थितीदेखील लक्षवेधी ठरत असते.
हेही वाचा: Nashik : अनाधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई
"उन्हाळी सुट्यांमुळे पर्यटकांचा प्रतिसाद वाढता आहे. उन्हाळ्याच्या झळांपासून दिलासा मिळविण्यासाठी व साहसी पर्यटनाचा आनंद लुटण्याकडे अनेकांचा कल बघायला मिळतो आहे. वीक एंडला प्रतिसाद आणखी वाढत असतो." -दत्ता रेवणकर, बोट क्लब, एमटीडीसी.
Web Title: Increasing Response To Mtdc Boat Club On Gangapur Dam During Summer Vacation Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..