Independence Day 2023: ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Har Ghar Tiranga Abhiyan
Har Ghar Tiranga AbhiyanEsakal
Updated on

Independence Day 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. (Independence Day 2023 Collectors appeal for Ghroghari Triranga campaign nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Har Ghar Tiranga Abhiyan
Independence day: वाहनांवर तिरंगा लावण्याआधी जाणून घ्या नियम, नाहीतर पडेल महागात

अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे,

प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता समारोप कार्यक्रमानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान होणार आहे.

जिल्ह्यातील टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहे. घरोघरी तिरंगा हा १३ ते १५ ऑगस्टदरम्यान फडकलेला असेल. रोज सायंकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. मात्र, कार्यालयांनी ध्वजसंहिता पाळावी, असेही आवाहन केले आहे.

Har Ghar Tiranga Abhiyan
Nashik ZP News: जिल्हा परिषदेच्या 15 कोटींच्या रस्त्यांची लागली वाट! समृद्धी महामार्गाचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com