सिटी लिंकतर्फे आजपासून महिलांसाठी स्वतंत्र बससेवा | Nashik

Independent bus service for women from today through Citylinc Nashik News
Independent bus service for women from today through Citylinc Nashik Newsesakal

नाशिक : महानगर परिवहन महामंडळ (Metropolitan Transport Corporation) अर्थातच सिटी लिंकतर्फे (Citylinc) मंगळवारी (ता. २६) खास महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील तीन मार्गांवर आठ फेऱ्यांच्या माध्यमातून या महिला विशेष बस (Women's special bus) धावणार आहेत.

मार्ग क्रमांक १०१ - फेरी क्रमांक १, गंगापूर गाव ते निमाणीमार्गे बारदान फाटा, सातपूर, सिव्हिल, निमाणी सकाळी ९.३०. फेरी क्रमांक २ निमाणी ते गंगापूर गावमार्गे सिव्हिल, सातपूर, बारदान फाटा, गंगापूर गाव ५ ला. मार्ग क्रमांक १०३ फेरी क्रमांक १ अंबडगाव ते निमाणीमार्गे सिम्बायोसिस, उत्तमनगर, पवननगर, निमाणी सकाळी ९.२५, तर फेरी क्रमांक २ निमाणी ते अंबडगावमार्गे पवननगर, उत्तमनगर, सिम्बायोसिस, अंबडगाव सहा, मार्ग क्रमांक २६६ - फेरी क्रमांक १ नाशिक रोड ते निमाणीमार्गे द्वारका, शालिमार, सीबीएस, निमाणी सकाळी ९.३०, तर फेरी क्रमांक २ निमाणी ते नाशिक रोडमार्गे सीबीएस, शालिमार, द्वारका, नाशिक रोड सकाळी ९.३०. फेरी क्रमांक ३ नाशिक रोड ते निमाणीमार्गे द्वारका, शालिमार, सीबीएस, निमाणी ६, तर फेरी क्रमांक ४ निमाणी ते नाशिक रोडमार्गे सीबीएस, शालिमार, द्वारका, नाशिक रोड या मार्गावर महिला विशेष बस धावणार आहेत.

Independent bus service for women from today through Citylinc Nashik News
कृषी मंत्री दादाजी भुसे यांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई | Nashik

तीन मार्गांवर आठ फेऱ्यांच्या माध्यमातून धावणाऱ्या या महिला विशेष बससेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंकतर्फे करण्यात आले आहे.

Independent bus service for women from today through Citylinc Nashik News
Nashik | बांधकाम परवानगी नियमाला मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com