Onion Export Policy India
sakal
किरण कवडे- नाशिक: कांद्या निर्यातीविषयीच्या अस्थिर धोरणामुळे देशाच्या कांदा निर्यात महसुलात तब्बल एक हजार १०० कोटींची घट झाली आहे. या तुलनेत बांगलादेशने २०२४ मध्ये एक हजार ७०० कोटींची निर्यात केली. सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यावर पाकिस्तानने या संधीचा फायदा घेत डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे दोन लाख २० हजार टन निर्यात करीत भारताने सोडलेल्या बाजारपेठेतील तूट भरून काढल्याची माहिती कृषिमूल्य आयोगाच्या उपसमितीच्या अहवालातून समोर आली आहे.