Unseasonal rain and hailstorms damaged onion crops across parts of Nashik district, while cultivation area also declined.
esakal
लासलगाव : देशातील एकूण फलोत्पादनात यंदा वाढ अपेक्षित असली, तरी कांदा उत्पादनात मात्र घट होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने व्यक्त केला. २०२५-२६ च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात तीन हजार ८६९.१५ लाख टन फलोत्पादन अपेक्षित असून, त्यात गतवर्षाच्या तुलनेत ४.३६ टक्के वाढ होणार आहे. मात्र, कांद्याचे उत्पादन ३०७.६७ लाख टनांवरून २८८.९६ लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १७ नोव्हेंबरला हे अंदाज जाहीर केले