टुडे पान २ साठी.. अवतीभवती

टुडे पान २ साठी.. अवतीभवती
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती -- न्यू सिटी शाळेत वायुसेना दिन धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये भारतीय वायुसेनेचा ९४ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. या प्रसंगी मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे यांनी उपस्थितांना सशस्त्र दलांविषयी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक एस. व्ही. भामरे आणि पर्यवेक्षक डॉ. एन. यु. बागूल यांनी भारतीय सेनेचे कार्य याविषयी माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान एनसीसी छात्रसैनिकांना स्वातंत्र्यसैनिकांचे माहितीपर व्हिडिओ, वायुसेनेची कार्यपद्धती व ‘सिंदूर ऑपरेशन’ या प्रसंगांवर आधारित लघुपट दाखवण्यात आले. या वेळी ८४ छात्रसैनिक उपस्थित होते. या उपक्रमाला ४८ महाराष्ट्र बटालियनचे समदेशक कर्नल संजय कुमार, प्रशासन अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा आणि सुभेदार मेजर मोहम्मद इकबाल यांचे मार्गदर्शन झाले. एनसीसी अधिकारी एस. टी. पाटील यांनी संयोजन केले. -- जयकुमार चौधरीची राष्ट्रीय फेरीत निवड धुळे : येथील निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीजचा प्रथम वर्षातील विद्यार्थी जयकुमार पंडित चौधरी याची भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या ‘इंडिया ओपन कॉम्पिटिशन इन रायफल अँड पिस्तूल- २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मध्य प्रदेश स्टेट शूटिंग अकॅडमी येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे. यात जयकुमार ‘१० मीटर एअर पिस्तूल ज्युनिअर’ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. १२ ऑक्टोबरला स्पर्धा होईल. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष रोहीत निकम यांनी जयकुमारचा सत्कार केला. प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव प्रा. शुभांगी निकम, सदस्य डॉ. आदित्य निकम, प्राचार्य प्रा. डॉ. सुनील देसले, प्राचार्य प्रा. डॉ. रवीकुमार पाटील, प्राचार्य प्रा. अनंत वाघ, प्राचार्य प्रा. नितीश बडगुजर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांनी जयकुमारचे कौतुक केले. -- जयहिंद महाविद्यालयात सूत्रसंचालन कार्यशाळा धुळे : जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व मराठी विभागातर्फे ''एकदिवसीय सूत्रसंचालन कार्यशाळा'' उत्साहात पार पडली. शहरात अशा आशयाची ही पहिलीच कार्यशाळा झाली. प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. संस्थेचे संचालक मोहन मोरे यांनी सूत्रसंचालनाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य पाटील यांनी संवाद कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. पहिल्या सत्रात निवृत्त प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी भाषा कौशल्य, सभागृहाचे मानसशास्त्र व वेळेच्या नियोजनावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात वक्ते डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालक व निवेदक यातील फरक स्पष्ट करत देहबोली व हजरजबाबीपणावर भर दिला. तिसऱ्या सत्रात उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील यांनी सादरीकरण व स्पष्ट उच्चारांचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. के. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. मनीषा पाटील, पर्यवेक्षक दीपक चौधरी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. राजन पाटील उपस्थित होते. प्रा. भाग्यश्री पाटील यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. संयोजिका डॉ. योगिता पाटील यांनी आभार मानले. प्रा. उमेश फुलपगारे आणि प्रा. गीतांजली बागल यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले. -- वृक्षारोपणाने साजरा केला वाढदिवस धुळे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अवाजवी खर्च टाळत येथील शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा केला. श्री. कुसळकर यांनी वाढदिवसानिमित्त पालघर जिल्ह्यातील वैती गावी वृक्षारोपण केले. या प्रसंगी राज्य संपर्कप्रमुख अनिल धमने पाटील, पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे, मनीषा धायगुडे उपस्थित होते. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com