IAF Seminar Nashik
sakal
नाशिक: जुन्या विमानांचा ताफा, वाढती ऑपरेशनल मागणी तसेच बदलणाऱ्या सुरक्षा नियमांबाबत हवाई दल अधिक गांभीर्याने लक्ष देत आहे. भविष्यात विमानांच्या सुरक्षतेत वाढ करण्यासह तांत्रिक प्रगतीही गरजेची आहे, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल याल्ला उमेश यांनी केले. आधुनिक विमान वाहतूक क्षेत्रात विमानांची संरचनात्मकता व अखंडतेच्या कार्याचे महत्त्व वाढल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.