प्रा. जयश्री वाघ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

प्रा. जयश्री वाघ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
Published on: 
PHO26B17529 पाचोरा ः महाविद्यालयात प्रा. जयश्री वाघ लिखित पुस्तक प्रकाशनप्रसंगी संजय वाघ, खलील देशमुख, सतीश चौधरी, प्रा. राजेंद्र चिंचोले, डॉ. वासुदेव वले आदी. प्रा. जयश्री वाघ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ वृत्तसेवा पाचोरा, ता. २६ ः येथील एम. एम. महाविद्यालयात प्रा. जयश्री वाघ लिखित व संपादित ‘इंडियन नॉलेज सिस्टीम इन कॉमर्स ॲन्ड मॅनेजमेंट मल्टीडिसिप्लिनरी अँप्रोच’ या पुस्तकाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे व ज्योती वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. महाविद्यालयात आयोजित वाचन संस्कार कार्यशाळेत प्रा. जयश्री वाघ हा प्रकाशन सोहळा पार पडला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आल्याने भारतीय ज्ञान परंपरेचा वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्राशी असलेला संबंध उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. याप्रसंगी खलील देशमुख, सतीश चौधरी, प्रा. राजेंद्र चिंचोले, डॉ. वासुदेव वले, डॉ. एन. एन. गायकवाड, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. योगेश महाले, डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. संदीप माळी, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. अक्षय घोरपडे आदी उपस्थित होते. प्रा. जयश्री वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल भोसले यांनी सूत्रसंचलन तर डॉ. माणिक पाटील यांनी आभार मानले. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com