नाशिक रोड- रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली. प्रवासी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पायलट प्रकल्पाच्या सकारात्मक निकालांवर आधारित रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.