सावंत यांना अमेरिकेच्या
आर्ट म्युझियमचे निमंत्रण
भारतातील पहिल्या जलरंग चित्रकाराला मान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित कॅमेरामन आर्ट म्युझियम, विल्मिंटन, नॉर्थ कॅरोलिना येथील अमेरिकन चित्रकारांना जलरंग चित्रकलेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
नॉर्थ कॅरोलिना राज्यातील विल्मिंटन येथे असलेले कॅमेरॉन आर्ट १९३८ मध्ये स्थापन झालेले प्रतिष्ठित कला संग्रहालय आहे. या उपक्रमांतर्गत सावंत यांना १७ ते १८ नोव्हेंबरदरम्यान दोन दिवसीय कार्यशाळेत जलरंगातील विविध तंत्र, रंगसंगती, प्रकाश छाया, वातावरणनिर्मिती व चित्ररचनेचे बारकावे सावंत शिकविणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कलाप्रवासावर व जलरंगातील स्वतःच्या चित्रशैलीवर आधारित व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांचे ३५ ते ४० निवडक जलरंग चित्रांचे प्रदर्शन होणार आहे. सावंत गेल्या पंधरा वर्षापासून जगभरातील विविध देशांमध्ये भ्रमंती करीत असून त्यांच्या जलरंग चित्रशैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. निमंत्रण मिळालेले ते पहिले भारतीय चित्रकार असल्याचे यानिमित्ताने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
-- कोट
फोटो : H34690
अमेरिकेतील प्रतिष्ठित कला संग्रहालयाने भारतीय चित्रकाराला तेथील चित्रकारांना जलरंग कलेचे मार्गदर्शन करण्याची संधी दिली. हा माझा वैयक्तिक गौरव नसून नाशिकच्या कला परंपरेचा आणि भारतीय जलरंग कलेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे.
-प्रफुल्ल सावंत, चित्रकार
----------------