Nashik News : दहशतवादाविरोधात भारताचे युद्ध : भुजबळ
Chhagan Bhujbal : सर्व भारतीयांनी सतर्क राहून सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सरकारकडून येणाऱ्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक- भारताने कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हे, तर दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले आहे. भारतीय हवाई दलाने फक्त दहशतवाद्यांच्या स्थळांवर हल्ले केले. अशा परिस्थितीत शत्रू राष्ट्राकडून काही क्रिया होऊ शकते.