फोटो : NSK26H32698
धनखेडी : श्रमदानातून बंधारा बांधतांना आदिवासी बांधव.
--------------
‘एल निनो’च्या संकटाशी भिडले आदिवासी बांधव
सातपुड्यात श्रमदानातून बांधले ७ वनराई बंधारे
सकाळ वृत्तसेवा
धडगाव, ता. १८ : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे नंदुरबार जिल्हा भीषण दुष्काळाशी सामना करीत आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची चिन्हे आहेत. या भीषण संकटावर मात करण्यासाठी धडगाव तालुक्यातील धनखेडी पाड्यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येत श्रमदानातून चक्क ७ वनराई बंधारे बांधले आहेत.
पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी वनराई बंधारे हा कमी खर्चाचा प्रभावी उपाय आहे. धनखेडी पाड्यातील गावकऱ्यांनी आपल्या परिसरातील ओढे आणि नाल्यांवर हे बंधारे उभारले आहेत. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये माती आणि वाळू भरून हे बंधारे तयार केले असून यामुळे वाहणारे पाणी अडवून जमिनीत झिरपण्यास मदत होईल. वनराई बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत हे बंधारे गावकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतील.
-------
कोट---
धनखेडी पाड्यातील आदिवासी बांधवांनी दाखवलेली एकजूट आणि केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे. शासनानेही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन दुष्काळ निवारणासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे.
- इंजि. प्रविण पावरा, सामाजिक कार्यकर्ते