धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H33206
धुळे : बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर. शेजारी प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील.
---
स्वदेशी क्षेपणास्त्र निर्मितीतून भारताचे प्रगत देशात स्थान
---
डीआरडीओचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ देवधर; देवरे अभियांत्रिकीत मार्गदर्शन
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : भारताची संरक्षण क्षेत्रातील सज्जता व गेल्या काही वर्षांत भारताने क्षेपणास्त्रे निर्याती पर्यंत गाठलेली मजल याचा गौरवपूर्ण उल्लेख करत भारताने स्वदेशी क्षेपणास्त्रे निर्माण करून प्रगत देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन डीआरडीओचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर यांनी येथे केले.
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात एक्ट्रॉ करिक्युलम ॲक्टीव्हीटी सेलतर्फे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ देवधर यांनी युवा भारत फोरम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत डीआरडाओमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून बारा वर्षे काम केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी तब्बल दोन तास मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अर्जुन, ब्रह्मोस, पृथ्वी, त्रिशूल, नाग, अग्नी, आयएनएस विक्रांत आदी क्षेपणास्त्र निर्मिती दरम्यानचे विविध टप्पे उलगडून सांगितले. तसेच, पोखरण अणुचाचणी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्य दलाची कामगिरी आदींवर भाष्य केले. ‘हर काम देशके नाम’ हा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्राध्यापकांशी संवाद
प्रारंभी प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील यांनी श्री. देवधर यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले. श्री. देवधर यांनी महाविद्यालयातील विभागप्रमुख व प्राध्यापकांशी अनौपचारिक संवाद साधला. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक प्रशांत मोराणकर, बांधकाम व्यावसायिक संजय देसले, दीपक सोनवणे, ॲड. कुणाल पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे, प्रा. डॉ. विनोद शिंदे, प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. अभिजित मोरे, प्रा. डॉ. योगेश पाटील, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संगीता राजपूत, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हीटी को-ऑर्डीनेटर प्रा. डॉ. शैलेश देवरे उपस्थित होते. प्रा. डॉ. सौ. राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सर्व विभागातील विभागीय समन्वयक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
---