मनपात इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती

मनपात इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती
Published on: 
टूडे साठी ----------- इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना महापालिकेत अभिवादन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : महापालिकेतर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. शालिमार येथील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपायुक्त नितीन नेर व अधीक्षक हेमंत झुटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, साहेबराव भोसले, आकाश शिनगाण, मनोज खैरनार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनात इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, साहेबराव भोसले, आकाश शिनगाण, मनोज खैरनार, श्रीकांत भोई, योगेश कापडे, रमेश पागे, मोहन गांगुर्डे, मयूर भदाणे, मनोज गायधनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मनिषा पाटेकर यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. ------------------------ भाजप कार्यालयात कार्यक्रम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा सरचिटणीस सुनील देसाई आणि ज्येष्ठ नेते काशिनाथ शिलेदार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी हेमंत शुक्ल, वसंत उशीर, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, पवन उगले, विजय कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.