इंदिरानगर: अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या दाढेगावच्या वालदेवी नदीवरील धोकादायक पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेला आविष्कार संजय गोडसे (वय १३) आणि त्याला वाचविण्यासाठी धावून गेलेले रामदास पवार या दोघांना स्थानिक युवकांनी जिवाची पर्वा न करता वाचविले. शुक्रवारी दुपारी (ता. २२) साडेबाराला ही घटना घडली.