इंदिरानगर- विडी कामगार सोसायटी भागात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर वडाळा आणि इंदिरानगर भागातील दोन खड्डे चर्चेत आले आहेत. शिवाजीवाडीकडून इंदिरानगरच्या मुख्य रस्त्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्याने वडाळा गावाकडे जाताना जेएमसीटी महाविद्यालयाच्या अगदी समोर मुख्य रस्त्याला लागून सुरू असलेल्या भागात मोठा खड्डा खोदला आहे. रस्त्याच्या बाजूने असलेले कुंपण तुटले आहे. रात्री येथे वीज नसली तर अंधारात वाहनचालक या खड्ड्यात जाण्याचाही धोका आहे.