सातपूर-औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी भक्कम पावले उचलावीत, अशी मागणी उद्योजकांनी ‘निमा’ सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात केली. औद्योगिक सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि उद्योजकांच्या पोलिस यंत्रणेबाबत असलेल्या समस्या उद्योजकांना थेट मांडता याव्यात यासाठी निमा सभागृहात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.