उद्योग क्षेत्राच्या सहभागातून दीर्घकालीन विकास : सिंह

उद्योग क्षेत्राच्या सहभागातून दीर्घकालीन विकास : सिंह
Published on: 
उद्योग क्षेत्राच्या सहभागातून दीर्घकालीन विकास आयुक्त सिंह : सिंहस्थ पार्टनर्स बैठकीत सीएसआरवर चर्चा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता, २३ : सिंहस्थ कुंभमेळा हे नियोजन, नावीन्य व सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. कंपन्यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्य, अनुभव व नावीन्यपूर्ण उपाय प्रशासनासोबत सामायिक करावे. भाविकांसाठी उत्तम सुविधेसह स्थानिकांनाही दीर्घकाळ लाभदायी ठरतील अशा भागीदारी विकसित कराव्यात, असे आवाहन कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी केले. कुंभमेळा प्राधिकरणातर्फे सिंहस्थात उद्योग क्षेत्राच्या सक्रिय सहभागासाठी सिंहस्थ पार्टनर्स-सीएसआर सीईओ मीटचे आयोजन करण्यात आले. प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रमोद पवार यांच्यासह विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयुक्त सिंह पुढे म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्यतेचा विचार करून आयोजनाची जबाबदारी केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही. तर विविध क्षेत्रांच्या सहभागातून ती अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल. पवार यांनी आरोग्य, स्वच्छता, तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांत कंपन्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योगदान द्यावे असे आवाहन केले. कुंभमेळ्यात आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील अनुभव, तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण उपायांचा उपयोग करून घेण्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांसाठी दीर्घकालीन लाभ निर्माण करणे हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता. आरोग्य, स्वच्छता, पर्यावरणाला प्राधान्य बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये आरोग्यसेवा व आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, सार्वजनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये कॉर्पोरेट कंपनांना सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. भाविकांची सुरक्षितता आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचाही विचार करण्यात आला. फोटो क्रमांक :- एच-33404

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com