नाशिक- काठे गल्ली सिग्नलनजीक अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्यापूर्वीच मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री झालेल्या दंगलसदृश परिस्थितीत आक्रमक समाजकंटकांच्या जमावाने पोलिसांच्या तीन वाहनांची तोडफोड केली. तर, समाजकंटकांनी केलेल्या दगड व काचेच्या बाटल्या फेकल्याने पोलिस अधिकारी, अंमलदारांसह २३ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.