Nashik Accident News : अपघातात जखमी वारकऱ्याचा मृत्यू

Death News
Death Newsesakal

Nashik News : त्र्यंबकश्वर येथे दर्शन घेऊन पंढरपुरकडे निघालेल्या वारकऱ्याला रिक्षाने धडक दिली. यात गंभीर जखमी वारकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात त्र्यंबक रोडवरील विसे लॉन्ससमोर शनिवारी (ता.३) सकाळी दहाच्या सुमारास घडला. (Injured worker dies in accident Nashik Accident News)

मधुकर चिल्लू शिंदे (६७, रा. महाजनपूर, ता. निफाड, जि. नाशिक) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. श्री. शिंदे हे महाजनपूर येथून वारीत सहभागी झाले होते.

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन ते पंढरपूरच्या दिशेने दिंडीत प्रस्थान करीत होते. त्याचवेळी एका रिक्षाने त्यांना धडक दिली.

त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सातपूर पोलिसात नोंद करण्यात आली असून, हवालदार भड तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com