इनरव्हीलतर्फे मंगळवारी
१४ शिक्षकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ३ : इनरव्हील क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनतर्फे शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध शाळांतील १४ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सहाला रोटरी मिडटाऊन सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी दिली. माजी उपमहापौर ॲड. ज्योती भोसले, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील आणि निवृत्त केंद्रप्रमुख नामदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. सन्मानार्थी शिक्षक : विद्या पवार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोयगाव), निलिमा देसले (जिल्हा परिषद शाळा, कळवाडी), शामल पाटील (जिल्हा परिषद शाळा, भायगाव), क्रांती चव्हाण (एल. व्ही. एच. स्कूल), अश्विनी देवरे (काबरा विद्यालय), वैशाली जैन (एज्युकेअर इंग्लिश स्कूल, सोयगाव), स्वाती शेवाळे (जिल्हा परिषद शाळा, टेहरे), स्वाती खैरनार (जिल्हा परिषद शाळा, तळवाडे), दीपाली गढरी (विशेष शिक्षिका, दाभाडी), पल्लवी बोरसे (शिव संस्कार स्कूल), वैभव वाघ (जिल्हा परिषद शाळा, पोहाणे), महेश ठाकरे (जिल्हा परिषद शाळा, बजरंगवाडी), अभिजित देसले (जिल्हा परिषद शाळा, वाघखोरे वस्ती) आणि दिगंबर देवरे (जिल्हा परिषद शाळा, पोहाणे)..