इनोव्हेशन क्रक्स स्पर्धा

इनोव्हेशन क्रक्स स्पर्धा
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- देवरे अभियांत्रिकीत इनोव्हेशन क्रक्स --- प्रकल्प संकल्पना सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २७ : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागांतर्गत कार्यरत ‘मटेरियल अडव्हांटेज चॅप्टर’तर्फे नुकतीच ‘इनोव्हेशन क्रक्स’ या अभियांत्रिकी प्रकल्प संकल्पना सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. या स्पर्धात्मक महोत्सवात एकूण १९ गट सहभागी झाले. स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी, परीक्षक प्रा. डॉ. अमोल नंदवालकर, प्रा. डॉ. दीपक सोनवणे, प्रा. शिवनाथ सिंग, समन्वयक प्रा. निखिल देशमुख, प्रा. संतोष पाटील आणि प्रा. कैलाश माखिजा आदी मान्यवर उपस्थित होते. संगणकीय प्रणालीद्वारे (डिजिटल पद्धतीने) या स्पर्धेचे दिमाखात उद्‌घाटन झाले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. विविध दालनांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अत्याधुनिक प्रकल्प संकल्पना परीक्षकांसमोर सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या निवडक सात सर्वोत्तम संकल्पनांना प्रत्येकी पाच हजारांचे संशोधन अनुदान जाहीर करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला नवी ऊर्जा मिळाली आहे. प्रा. इंद्रजीत वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख तथा मटेरियल अडव्हांटेज चॅप्टरचे फॅकल्टी को-ऑर्डीनेटर प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चॅप्टरचे अध्यक्ष शशिकांत माळी, उपाध्यक्ष अनिशा सगरे, सचिव सुयश गायकवाड आणि कोषाध्यक्ष सुयोग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com