सटाणा- ताहाराबाद (ता. बागलाण) येथील एका झुकलेल्या दुमजली इमारतीला पाडण्याऐवजी सरळ करण्याचा अभिनव आणि धाडसी प्रयोग सध्या सुरू असून, तो उत्तर महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. नंदकिशोर गंगाधर साळवे यांच्या पिंपळनेर रस्त्यावरील इमारतीचा पाया हलल्यामुळे ती झुकली होती. मात्र, इमारत न पाडता ती पुन्हा सरळ उभी करण्याचा निर्णय घेऊन साळवे यांनी अभूतपूर्व धाडस दाखवले आहे.