नाशिक- जिल्हा नियोजन विभागाला वार्षिक योजनेंतर्गत या वर्षी निधी उपलब्धतेची प्रतीक्षा कायम आहे. निधीअभावी नियमित विकासकामांचे नियोजन रखडले असताना वेळेअभावी नावीन्यपूर्ण योजनेला ‘ब्रेक’ लावला जाऊ शकतो..शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण आराखड्याच्या साडेतीन टक्के निधी हा दर वर्षी नावीन्यपूर्ण योजनांवर खर्च करायचा असतो. या निधीतून शिक्षण, आरोग्य क्षेत्र किंवा जिल्ह्याच्या अनुषंगाने विकासात पथदर्शी ठरणारे प्रकल्प उभारायचे असतात. त्यानुसार दोन वर्षांत नावीन्यपूर्ण योजनेतून विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत. परंतु यंदा नावीन्यपूर्ण निधीमधून पथदर्शी कामे उभी राहण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे..जिल्ह्याला २०२५-२६ मध्ये सर्वसाधारण आराखड्यासाठी ९२५ कोटींचा नियतव्यय मंजूर आहे. शासकीय निकषानुसार आराखड्याच्या साडेतीन टक्के म्हणजे साधारणत: ३३ कोटी रुपये नावीन्यपूर्ण योजनांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. परंतु, यंदाच्या आर्थिक वर्षाचे साडेतीन महिने संपुष्टात आले असताना शासनाने सर्वसाधारणचा एक रुपयाही जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेला नाही. .अशा परिस्थितीत नावीन्यपूर्ण योजनांचे भवितव्य अंधारात आहे. वास्तविक सध्या पावसाळा सुरू आहे. तसेच निधीची उपलब्धता नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प आहेत. दरम्यानच्या काळात नोव्हेंबर ते जानेवारी याकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेत विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे. अखेरच्या दोन महिन्यांत शंभर टक्के निधी खर्चासह विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडणार आहे. अशावेळी नावीन्यपूर्ण योजनांना कात्री लावली जाण्याची दाट शक्यता आहे..शासन निर्णय! 'वाळू घरांसाठी नव्हे, शासकीय प्रकल्पांनाच मिळणार'; रात्रीच्या वाहतुकीला परवानगी, सर्वसामान्यांची परवड .निधीअभावी अपेक्षाभंग?नावीन्यपूर्ण निधीमधून जिल्ह्यात दोन वर्षात महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले. त्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालये तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांवर सौरप्रकल्प उभारणे, जिल्हा परिषदेच्या ‘सुपर-५०’ यांसारख्या यशस्वी प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात नावीन्यपूर्ण निधीतून नाशिकमध्ये आणखी एक पथदर्शी प्रकल्प उभा राहील, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. पण निधीअभावी या अपेक्षांना सुरुंग लागू शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.