नाशिक MIDC स्फोट दुर्घटना : चौकशीचे आदेश

nashik
nashikesakal

नाशिक : सातपूरच्या ललित कंपनीत (satpur lalit company blast) झालेल्या स्फोट दुर्घटनेबाबत (satpur MIDC) चौकशी करण्याचे आदेश मंत्रालय स्तरावरून देण्यात आले. त्यानुसार (ता.१९) संबंधित अधिकारी सकाळ पासूनच घटनास्थळी जाऊन पाहणी करत जबाब घेतांना पाहायला मिळाले. सातपूर एमआयडीसीत ललित हॉड्रोलिक कंपनीत शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टेस्टिंग करीत असताना, नायट्रोजन गॅसचा स्फोट झाल्याने सुमारे सहा कामगार जखमी झाले. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, असे सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी महापालिका आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर या भागात प्रवेश बंद करण्यात आला. नायट्रोजन टाकीचा व्हॉल्व्ह उडाल्याने हा स्फोट झाल्याचे समजते. स्फोटच्या आवाजाने अक्षरश: कानठळ्या बसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली

नायट्रोजन गॅसगळती : 6 कामगार जखमी

सातपूर औद्योगिक वसाहतीत प्लॉट क्रमांक डी- ७१ मध्ये ललित हॉड्रोलिक कंपनी आहे. या कंपनीत विविध प्रकारचे हॉड्रोलिकचे उत्पादन तयार होते. कोरोनानंतर कंपनीत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कामगार कसरत करीत होते. कमी कामगारांमध्ये काम सुरू होते. शनिवारी सुटीच्या दिवशी एका उत्पादनाच्या टेस्टिंगचे काम सकाळपासून सुरू होते. साधारण ११ कामगार कामावर होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक टेस्टिंग सुरू असलेल्या जॉबतून नायट्रोजन गॅसगळती सुरू झाली. कामगारांना काही कळण्याच्या आतच स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती, की कंपनीच्या छतावरील सर्व पत्रे उडाली. या घटनेत ११ पैकी सहा कामगार जखमी झाले. जखमींना शेजारील कंपन्याचे मालक व इतर कामगारांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

nashik
नाशकात कृत्रीम तलावात बाप्पाचं विसर्जन;पाहा व्हिडिओ

दरम्यान, घटनास्थळी तत्काळ सहाय्यक आयुक्त समीर शेख, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. इतर कामगारांना धीर देत वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर साहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख व सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी गर्दी आटोक्यात आणत घटनेबाबत जाबजबाब नोदंविले. तर दुसऱ्या दिवशी (ता.२०) औद्योगिक सेफ्टी व कामगार विभागाचे मंत्रालय स्तरावरून सविस्तर अहवाल देण्याचे आदेश प्राप्त होताच संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पाहणी करून संबंधिताचे जाबजवाब नोंदविले.

nashik
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी बाप्पाचे विसर्जन;पाहा व्हिडिओ

अपघाताच्या प्रमाणात वाढ

यानंतर कंपनीत इन्स्पेक्टर राज तसेच मनमानी कारभार बंद करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला खरा. पण या निर्णयामुळे मात्र नेहमीत कारखान्यात तपासणी होत नसल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. या निर्णयाबाबत विचार करण्याची मागणी कामगार वर्गातुन होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com