नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात तक्रारी वाढत आहेत. आजही अनेक तालुक्यांत महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या सर्व प्रकारावर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना योजना ‘फेल’ गेल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वत:च जलजीवन मिशनमध्ये लक्ष घालताना योजनेच्या कामांची पाहणी व चौकशी करण्याचा निर्णय घेतला.