दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
Published on: 
टुडे ४, ॲन्कर ---- लोगो : प्रेरणादायी ------ NSK26H34221 जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे शेतकरी संवेदना अभियानांतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे, खते, दिवाळीचा फराळ वितरित करण्यात आला, त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांसह शेतकरी. ------- दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उपशीर्षक ‘भरारी’ची बळीराजासोबत दिवाळी; बियाणे, खत, फराळवाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : येथील भरारी फाउंडेशनतर्फे शेतकरी संवेदना अभियानांतर्गत जिल्ह्यातील अल्पभूधारक दुष्काळग्रस्त ४५ शेतकऱ्यांना बियाणे, खते व दिवाळीचा फराळ, मिठाई वाटप करण्यात आला. दुष्काळाची दाहकता तीव्र असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमाच्या माध्यमातून थोडे समाधान पेरण्याचे काम फाउंडेशनने केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून भरारी फाउंडेशन शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात असून याचाच एक भाग म्हणून रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे खचून न जाता पाणी कमी लागणाऱ्या पीकांचे उत्पादन घेण्याचे, महिला शेतकऱ्यांना गट शेती करण्याचे आवाहन केले. आमदार सुरेश भोळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या उपवर मुलींच्या विवाहासाठी सामूहिक विवाह कार्यक्रम आगामी काळात आयोजित करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त मिळालेल्या भेटीमुळे त्यांच्या व कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या उपक्रमासाठी रवींद्र फिरके, राहुल पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, भवरलाल ॲन्ड कांताई जैन फाउंडेशन, भाग्यश्री सिड्स, पद्मालम फार्मर प्रोड्युसर कंपनी सपन झुनझुनवाला आदेश ललवाणी, विकास वाघ यांनी सहकार्य केले. दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक तर अक्षय सोनवणे यांनी आभार मानले. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.