वीटभट्टी मजुरी ते वकिली व्हाया निर्माता, दिग्दर्शकाचा थक्क करणारा प्रवास

थक्क करणारा प्रवास, बागलाणकरांसाठी अभिमानाचा विषय ठरत आहे.
latest marathi news
latest marathi newsesakal

वीरगाव (जि. नाशिक) : लेखन, निर्मिती, चारोळी, वकिली अशा विविध कला- गुणांनी परिपूर्ण नाव म्हणजे सोमदत्त मुंजवाडकर. वीटभट्टी मजुरी ते वकिली व्हाया निर्माता, दिगदर्शक असा थक्क करणारा प्रवास, बागलाणकरांसाठी अभिमानाचा विषय ठरत आहे. (latest marathi news)

latest marathi news
Ashadhi Ekadashi 2022 : जीवनाचा समग्र स्वीकार वारी म्हणजे

मराठी शाळेपासून तर पदवीपर्यंत संपूर्ण शिक्षण मराठा इंग्लिश स्कूल व सटाणा महाविद्यालयात झाले. परंतु, या संपूर्ण कालावधीत घरची परिस्थिती बेताचीच असल्याने लोकांच्या शेतात शेतमजुरी, वीटभट्टीवर मजुरी, गवंड्याच्या हाताखाली मजुरी, तसेच सेंट्रींग कारागिर, विहीर खोदकाम, रिक्षा चालविणे, मिळेल त्या पद्धतीने काम करून उपजीविका केली. वडील शिक्षक. मात्र, बेताचीच परिस्थिती असल्यामुळे मजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. यातच साहित्याचा वारसा वडिलांकड़ून लाभला. एलएलबी नाशिक येथे एनबीटी लॉ कॉलेजला केले. दोंदे हॉस्टेल येथे राहत असताना समोरच कविवर्य कुसुमाग्रज यांचा व वसंत कानेटकर या साहित्यिकांचा सहवास लाभला. त्यामुळे साहित्याला प्रेरणा मिळाली. याच काळात सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक उत्तम कांबळे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला आणि अनेक ललित लेख, कविता, कथा सकाळ वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यात. त्यामुळे साहित्याला बळकटी मिळाली.

latest marathi news
PHOTOS: पणजोबा ते पणतू; शिंदे घराण्यातल्या चार पिढ्या विठोबा चरणी!

सटाणा न्यायालयात वकिली सुरु केली. त्यावेळी लिखाणाची गोडी वाढत गेली. याच काळात महाराष्ट्रातील पहिला अहिराणी चारोळी संग्रह ‘पस्तावा’ प्रसिद्ध झाला. यानंतर ‘धुक्यातल्या पाऊलखुणा’, ‘रान चिमण्या’ व्हिडिओ अल्बम अशा विविध माध्यमातून लिखाण सुरु आहे. अवघ्या काही दिवसापूर्वीच उदगीर येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तालुक्यातून नवोदित कवी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

मिळालेले पुरस्कार

* माळी महासंघ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंचतर्फे ‘समाजभूषण’

* भारत विकास प्रबोधनीतर्फे ‘कसमादे गौरव’ पुरस्कार

* निगळ फिल्म प्रॉडक्शन नाशिकतर्फे ‘कलारत्न दादासाहेब फाळके’ पुरस्कार

* खानदेश साहित्य संघ सुरततर्फे ‘बहिणाबाई चौधरी’ पुरस्कार

latest marathi news
मायभूमीने केलेला प्रेरणादायी सन्मान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com