मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या आदर्श शेतकरी कल्पना मोहिते

मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या आदर्श शेतकरी कल्पना मोहिते
Published on: 
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन विशेष पानासाठी हेडींग, सबहेडींग आणि लीड ----------- कष्टाच्या मातीतील कर्तृत्वाची हिरकणी! शेतशिवारापासून समाजपरिवर्तनापर्यंत ग्रामीण महिलांची भरारी सकाळ वृत्तसेवा धुळे/ नंदुरबार, ता. १४ : पहाटेच्या अंधारात चूल पेटविण्यापासून शेतात राबण्यापर्यंत, कुटुंबाचा गाडा ओढण्यापासून गावाच्या विकासाची धुरा सांभाळण्यापर्यंत ग्रामीण महिला अविरत झटत आहेत. कष्टाच्या हातांना जिद्दीची जोड, अनुभवाला आत्मविश्वासाचे बळ आणि कर्तृत्वाला संधी मिळाली, तर त्या केवळ कुटुंबाचा आधार राहत नाहीत, तर समाजपरिवर्तनाच्या अग्रदूतही ठरतात. शेती, बचत गट, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन! ------------ महिला विशेषसाठी ---- फोटो : NSK26H32357 वडाळी : स्वत: ट्रॅक्टर चालवून शेतात जातांना कल्पना मोहीते ------------------ शेती कसून कुटूंबाचा गाडा ओढणाऱ्या कल्पना मोहिते संजय मिस्तरी : सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. १४ : वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर चार अपत्यांचे पालनपोषण करून कुटुंबाचा गाडा ओढण्याचे आव्हान कल्पना मोहिते यांच्यापुढे होते. परिस्थिती कठीण होती, पण त्यांनी कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवली नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पदरी असलेल्या तुटपुंज्या शेतात राबून घाम गाळण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. डोक्याचा पदर कमरेला बाधून रुमण्याची मूठ हातात धरली. आलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी दोन हात करण्याची तयारी ठेवली. --------- शेतात राबून काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. शेतीबरोबर सामाजिक हित जोपासण्याचा चंग बांधला. मुलांना बापाच्या मायेची कमतरता भासू दिली नाही. स्वत:चे चांगले शिक्षण झाले नसले लेकरांना उच्चशिक्षित करायचा चंग बांधला. रात्रंदिवस मेहनत करून शेतात लाखांचे उत्पन्न काढून स्वताःचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रवास सुरू केला व दुसऱ्यांनाही मदतीचा हात देत राहील्या... ही संघर्षमय कहाणी आहे वडाळी (ता. शहादा) येथील श्रीमती कल्पना वसंत मोहिते यांची! कल्पना मोहीते यांच्या पतीचे २००६ साली आजारपणामुळे निधन झाले. पोटी चार अपत्य. त्यात तीन मुली, एक मुलगा. घरची परिस्थिती अतिशय नाजूक. तीन एकर जमीन तीदेखील कोरडवाहु. त्यामुळे जीवन जगावे कसे? मुलांचे संगोपन, शिक्षण करायचे कसे, असे अनेक प्रश्‍न भेडसावत होते. मात्र, मनाचा निर्धार केला आपण स्वत:च शेती कसायची. शिक्षण कमी असले तरी पतीबरोबर शेतात राबताना आलेल्या अनुभवांची शिदोरी जवळ होती. औत हाकण्याचे काम शिकल्या. पेरणीपासून मशागतीपर्यंत सर्व कामे स्वत:च करू लागल्या. पीक काढणीपासून विक्रीपर्यत ही सर्व कामे स्वत:च हाताळू लागल्या. स्वत:च्या हिम्मतीवर शेती करत उत्पनात आघाडी घेतली. हाती आलेल्या पैशातून शेतीत आवश्यक त्या सुधारणा केल्या. कोरडवाहु शेती बागायती झाली. शेतात रात्रंदिवस राबूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही. मुलाला इंजिनियरिंगसह कृषी पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. एका मुलीला स्थापत्यशास्त्र, तर दुसऱ्या मुलीला शिक्षक बनविण्यासाठी एम.ए., डी.एड., बी. एड. पूर्ण केले. सामाजिक क्षेत्राची आवड असल्याने दोनवेळा ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्या. सोबतच गावातील मुलांना वाचनांची गोडी व्हावी म्हणून रमाई वाचनालय उघडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीत हिरीरीने सहभाग घेऊन पुतळा सुशोभिकररणात महत्वाची भूमिका निभावली. महापुरूषाचा जयंती सोहळा असो की अन्य कोणताही उत्सव मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन साजरा करतात. ----------------- परिस्थिती कशीही असो कामाची उर्मी आपल्या अंगी असावी. समाज सहानुभूती दाखवेल, पण दुःखाचा भार आपल्यालाच उचलावा लागतो. म्हणून सकारात्मक विचार अंगी असावेत. त्यामुळे माणूस निर्भिड बनतो. - कल्पना वसंत मोहिते, शेतकरी तथा ग्रा. पं. सदस्य, वडाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com