विवाह अनुदान द्या

विवाह अनुदान द्या
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H34465 धुळे : आंतरजातील विवाह प्रोत्साहन अनुदान तत्काळ बँक खात्यावर वर्ग करा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांना देतांना लाभार्थी सागर वाडेकर. --- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान तत्काळ द्या --- लाभार्थींची जिल्हा परिषद सीईओंकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ : आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतंर्गत मंजूर ५० हजार रुपये अनुदान तत्काळ बँक खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी या योजनेचे लाभार्थी सागर गणेश वाडेकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. श्री. वाडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझा आंतरजातीय विवाह झाला असून, शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला आहे. समाजकल्याण विभाग व दिव्यांग विभागाने अर्जास मंजुरी दिली आहे. तसेच, जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत आपल्या उपस्थितीत आम्हा उभयतांचा १३ ऑक्टोबर २०२६ ला सत्कार करुन आपल्याहस्ते ५० हजारांचा डिजिटल धनादेशही प्रदान करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाला आता १५-२० दिवस उलटूनही अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. प्राप्त माहितीनुसार शासनाकडून या योजनेसाठी जिल्हा परिषदेला २१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. असे असतांना मंजुरीप्राप्त लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास विलंब होत आहे. याबाबत संबंधित विभागात वारंवार पाठपुरावा केला मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभागांना निर्देश देवून अनुदान तत्काळ आमच्या बँक खात्यात वर्ग करावे, अशी मागणी श्री. वाडेकर यांनी केली आहे. येत्या सात दिवसाच्या आत अनुदानाची रक्कम जमा न झाल्यास आम्हाला नाइलाजास्तव जिल्हा परिषदेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही श्री. वाडेकर यांनी निवेदनातून दिला आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.