NSK26H31064
जळगाव : आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धेतील विजयी संघासमवेत माजी महापौर रमेश जैन, प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, डॉ. उमेश पाटील, प्रा. नितिन चौधरी आदी.
-------------
लॉन टेनिस स्पर्धेत नाहाटासह
केसीईचे महाविद्यालय विजयी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा (पुरुष व महिला) नुकतीच झाली. यात मुलांमध्ये भुसावळचे पी. ओ. नाहाटा महाविद्यालय व मुलींमध्ये केसीईचे व्ही. पी. होले शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले.
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने झालेल्या या स्पर्धेचे उद् घाटन माजी महापौर रमेश जैन व प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते झाले. क्रीडा समितीचे सचिव डॉ. उमेश पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. नितिन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत पुरुषांचे चार व महिलांचे चार असे एकूण आठ संघ सहभागी होते. यात होले महाविद्यालय जळगाव, संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर, केसीईचे आयएमआर जळगाव व नाहाटा महाविद्यालय भुसावळ यांचा सहभाग होता. स्पर्धेत एकूण ४८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पंचप्रमुख कृपालसिंग ठाकूर व प्रतीक हरिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली.
चौकट
स्पर्धेचा निकाल असा
पुरुष गटात प्रथम पी. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ, द्वितीय केसीई व्ही. पी. होले शारीरिक शिक्षण महाविद्यालय जळगाव, तृतीय खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर) जळगाव. महिला गटात प्रथम होले शारीरिक शिक्षण महाविद्यालय जळगाव, द्वितीय नाहाटा महाविद्यालय भुसावळ, तृतीय आयएमआर कॉलेज जळगाव.