धुळे : टुडे पान २ साठी..
--
धुळ्यात गुरुवारपासून आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा
--
एसएनडीटी विद्यापीठासह महिला महाविद्यालयातर्फे क्रीडा महोत्सवाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई व वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित देवपूर येथील कला, वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान सिनीयर आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा होत आहेत. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात राज्यातील २२ महाविद्यालयांतील सुमारे ३५० विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (ता. २२) दुपारी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडला. मंडळाच्या अध्यक्ष स्मिता अजमेरा अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी आणि विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, मंडळाचे सचिव ऋषी अजमेरा, आयोजक प्राचार्य डॉ. डी. झेड. चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय खो- खो खेळाडू श्वेता गवळी व आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू निरज चौधरी, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षिका मुद्रा अग्रवाल, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू योगेश्वरी मिस्तरी, प्रो-कबड्डी खेळाडू व पोलिस प्रशिक्षक महेंद्र राजपूत आणि आंतरराष्ट्रीय ज्युदो खेळाडू हिमांशु पगारे यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेत बास्केटबॉल, व्हॉलीबॉल व ॲथलेटिक्स प्रकारांचा समावेश असून, २४ ऑक्टोबरला दुपारी एकला कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात समारोप समारंभ होईल.