आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन
स्पर्धेत दहा संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालय यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठअंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे (पुरुष व महिला) आयोजन करण्यात आले. यात महिला व पुरूष गटातून दहा संघांनी सहभाग नोंदविला आहे.
जळगाव विभागातील महाविद्यालयांतील पुरुष व महिला संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मु. जे. महाविद्यालयाच्या ह्युमिनिटी विभागाचे उपप्राचार्य डॉ. भूपेंद्र केसुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मु. जे.च्या जिमखान्याचे चेअरमन डॉ. जुगलकिशोर दुबे, व्ही. पी. होले शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. आकाश धनगर, प्रा. इरतेकाज सय्यद, प्रा. प्रणव बेलोरकर, जी. जी. खडसे कॉलेज मुक्ताईनगरच्या क्रीडा संचालिका डॉ. प्रतिभा ढाके, संत मुक्ताबाई आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मुक्ताईनगरचे क्रीडा संचालक डॉ. वीरेंद्र जाधव, विद्यापीठाच्या पी.जी./यू.जी. जिमखानाचे प्रा. अमर हटकर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्रा. हिमाली बोरोले तसेच मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांची उपस्थिती होती.
चौकट
महिला गटातही प्रतिसाद
पुरुष गटात एकूण ५ संघांनी, तर महिला गटातही ५ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पुरुष व महिला गटातील संघांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करीत चुरशीच्या लढती दिल्या. तर अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी दर्जेदार आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेत पंच म्हणून अनंत अंबिकर, चेतन शिवदे, इमरान खान, वरून सटोटे, मुकेश काकडे यांनी काम पहिले. तसेच निवड समिती सदस्य म्हणून डॉ. प्रतिभा ढाके आणि डॉ. वीरेंद्र जाधव यांनी काम पार पडले.